Ladki Bahin Maharashtra Online Apply 2025 : राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार जी ह्याने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे तर आज आपण या योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Maharashtra Online Apply Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना 2024 |
सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्यभरातून या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे राज्य सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटीच्या जवळपास अर्ज प्राप्त झाली आहेत
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेचा पहिला हप्ता 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे
Ladki Bahin Yojana Maharashtra Eligibility
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही पात्रता जाहीर केलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक
- लाभार्थी महिलेची वय 21 ते 65 वर्ष आत असणे आवश्यक
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार व तसेच परिवारातील एक अविवाहित महिला
- लाभार्थी महिलेची बँक खाते असणे आवश्यक
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

Ladki Bahin Yojana Maharashtra Disqualification
- आयकर दाता कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र असेल
- स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून व इतर भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपत्र असेल
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपये पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ घेत असलेले महिला या योजनेसाठी अपात्र असेल
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार व आमदार असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र असेल
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याकडे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त स्थिती असल्यास ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार ( ट्रॅक्टर सोडून )
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही ? हे काम करा लगेच जमा होतील सर्व पैसे
Ladki Bahin Maharashtra Document
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र , जन्म दाखला, शाळा सोडण्यात दाखला, मतदान कार्ड, राशन कार्ड ( यापैकी कोणती एक 15 वर्ष पूर्ण झालेले पुरावा म्हणून जोडावे लागेल )
- उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड ( केसरी किंवा पिवळ्या रंगाची )
- हमीपत्र
- अर्जदार महिलेचा फोटो
- आधारला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक
- अर्ज करताना मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे
Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply 2025
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा होमपेज ओपन होईल
- होम पेजवरील अर्ज लोगिन या बटणावर क्लिक करावे

- तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार तुम्हाला तुमची लॉगिन युजर आयडी पासवर्ड तयार करायची आहे
- त्यासाठी खाली दिलेल्या त्यासाठी खाली दिलेल्या Create Account ? ह्या ऑप्शन वर क्लिक करावे
- तुमच्यासमोर न्यू रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरून घ्या
- कॅप्चर फील करून Sign up ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावा
- तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या
- अशा प्रकारे तुमची ह्या वेबसाईटवर युजर आयडी पासवर्ड क्रिएट होईल
- युजर आयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर तुमचे युजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यायचा आहे
- लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज फॉर्म दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा
- तुमचा आधार नंबर टाकून सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा
- तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या
- ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज ओपन होईल

- अर्जामध्ये मागितलेले सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावी सोबत अर्जदार महिलेची फोटो अपलोड करून घ्यावी
- अर्जाच्या शेवटी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे
- कागदपत्राची साईज 100 ते 200 kb आत ठेवून सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
- सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक कराव
अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या https://ladakibainmaharashtra.com/ माहिती प्राप्त करू शकता
FAQ- Ladki Bahin Maharashtra Online Apply 2025
2025 मध्ये नवीन लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार ?
महाराष्ट्र सरकारकडून सध्या महिलांच्या अर्जाची फेर पडताळणी सुरू आहे जशी फेर पडताळणी पूर्ण होणार तेव्हा सरकारकडून पुन्हा एकदा नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे
लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता 25 जुलै 2025 पासून जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे

I am Chandrakant Ghodke . For the past 10 years, I have been sharing information about government schemes through blogging and YouTube. On my website [https://ladakibahinmaharashtra.com] you will find accurate and reliable details about the Ladki Bahin Yojana as well as various other important government schemes. My constant effort is to deliver information that not only helps you but also makes your life a little easier.
Ok
Very nice