Ladki Bahin Yojana July Update : लाडक्या बहिणींना मोठा धक्का, सरकारने उचललं मोठं पाऊल

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana July Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना 1 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली असून या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देऊन महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे.

अशातच एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे या योजने संदर्भात महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊल उचलत तब्बल 80 हजारापेक्षा जास्त महिलांची अर्ज बाद केली आहे यामुळे जालना, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ सह अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांना दरमहा मिळणारे पंधराशे रुपये आता बंद होणार आहेत ज्यामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे.

लाडक्या बहिणींना मोठा धक्का

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांना मिळावा यासाठी सरकारने कडक निकष या योजनेमध्ये लागू केली आहे आयकर विभाग आणि संबंधित यंत्रणाकडून अर्जाची कसून पडताळणी सुरू आहे या योजनेच्या गरजू महिला लाभ मिळावा यासाठी सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.

योजनेच्या सुरुवातीपासून 2 कोटी 41 लाख महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे यासाठी तब्बल 46000 कोटी रुपयांचा निधी सरकारला राखीव ठेवावा लागत आहे मात्र आपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी कठोर तपासणी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

आतापर्यंत कोटीच्या संख्येने महिलांना लाभ मिळाला असला तरी अपात्र अर्जामुळे सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे अपात्र महिलांची अर्ज बाद होण्याची अनेक कारणे आहेत त्यामध्ये लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असणे.

कुटुंबातील कोणीही आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर करणे हे प्रमुख कारणे आहेत या काही कारणामुळे सरकार महिलांना या योजनेतून बाद करत आहे

हे पण वाचा : या दिवशी जमा होणार 13 वा हप्त्याचे 1500 रुपये, असे चेक करा तुमचे स्टेटस

सरकारने उचललं मोठं पाऊल

महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेल्या या पडताळणी प्रक्रिया अनेक जिल्ह्यातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद करण्यात आली आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यातील एकूण 5 लाख 42 हजार 392 अर्जांपैकी पैकी 57000 अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आली आहेत, नागपूर मध्ये 30000 प्राथमिक तपास मध्ये बाद करण्यात आली आहे, अमरावतीत 21000 अर्ज आणि यवतमाळमध्ये 27000 अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana July Update
Ladki Bahin Yojana July Update

या निर्णयामुळे अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांना या योजनेच्या आर्थिक लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो सरकारचा निर्णय योजनेची पारदर्शकता आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

योजनेसाठी पात्र तरीपण अर्ज बाद

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे परंतु त्यामध्ये अनेक पात्र महिलांचे पण अर्ज सरकारकडून बाद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांना पुन्हा एकदा आपले कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 13th Installment Date

Leave a Comment